breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

देवेंद्र फडणवीसांचा दावा:भाजपच महापालिका निवडणुकांमध्ये नंबर एकचा पक्ष होईल

नागपूर | टीम ऑनलाइन
काही महिन्यांनी राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह विरोधी पक्षांनीही कंबर कसली आहे. अशातच सत्ताधारी महाविकास आघाडीला  आज भाजपने जबर धक्का दिला. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने चार जागा काबीज करून आपले वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध केले. आजच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भाजपच्या  भविष्यातील विजयाची सुरुवात असल्याचे म्हणत आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच नंबर एकचा पक्ष राहणार असल्याचा दावा केला.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाआणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्यावर विश्वास ठेवून चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, अमरिश पटेल आणि वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. तसेच नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. त्यात आम्हाला निर्णायक विजयी मिळाला. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही आगामी महापालिका निवडणुकांची जय्यत तयारी केली आहे. भाजप महापालिका निवडणुका चांगल्या फरकाने विजयी होईल. भाजपच महापालिका निवडणुकांमध्ये नंबर एकचा पक्ष राहील, असा दावा त्यांनी केला.

नागपूर आणि अकोल्यात महाविकास आघाडीतील सदस्यांची आम्हाला साथ मिळाली. महाविकास आघाडीच्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला. ज्यांनी आम्हाला मते दिली त्यांचे मनापासून आभारी आहोत, असंही ते म्हणाले. नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांना एकच मत मिळालं आहे. खरे तर ते काँग्रेसमध्ये गेले ही त्यांची पहिली चूक होती. तिथे गेल्यावर त्यांची जी अवस्था झाली, त्यामुळेच त्यांनी काँग्रेसलाही मत दिले नाही. त्यांना जे मत मिळाले आहे, तेही काँग्रेसला नव्हे तर छोटू भोयर यांना स्वतःला मिळाले आहे, असे मला वाटत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

बावनकुळे हे दोन वर्षे संसदीय राजकारणात नव्हते. पण ही पार्टीत गॅप नव्हती. ही लेजिस्लेटिव्ह गॅप होती. बावनकुळेंकडे महासचिवपद हे महत्त्वाचे पद होते. त्याचा हा कमबॅक म्हणजे नेव्हर गो बॅकवाला कम बॅक आहे. बावनकुळेंच्या विजयाने विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. आम्ही विदर्भातील दोन्ही जागा जिंकलो. त्याचा फायदा भाजपला नक्कीच होईल, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button