Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल; कर्ज न भरल्याने संतापजनक कृत्य

औरंगाबाद :कर्ज न फेडल्याने ग्राहकांसोबत अमानुष वर्तन करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. औरंगाबादमध्येही अशीच एक घटना उघड झाली असून कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. ‘तुम्ही आमच्या संस्थेकडून घेतलेलं कर्ज बाकी असून त्याची परतफेड करा. अन्यथा तुमची सोशल मीडियावर बदनामी करू,’ अशी धमकी देवून भामट्यांनी तक्रारदार महिलेकडून १८ हजार १८४ रूपये उकळले. पैसे उकळल्यानंतरही आरोपींनी महिलेच्या आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रावरील फोटोंचा वापर करून ते अश्लील मजकुरासह सोशल मीडियावर शेअर करत बदनामी केली.

तक्रारदार ३९ वर्षीय महिला मूळची पुणे येथील खडकी परिसरातील असून ती सध्या श्रेयनगर परिसरातील काल्डा कॉर्नर येथे असलेल्या राठी मॅक्झिमा अपार्टमेंट येथे वास्तव्यास आहे. भामट्यांनी २० एप्रिल ते ३० मे २०२२ दरम्यान तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर विविध १६ क्रमांकावरून फोन करून तुम्ही घेतलेले कर्ज बाकी असून त्याची परतफेड करा, नाही तर आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदार महिलेने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर १८ हजार १८४ रूपये पाठवले होते.तक्रारदार महिलेकडून पैसे घेतल्यानंतरही भामट्यांनी तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रावरील फोटोंचा वापर करून सोशल मीडियावर तक्रारदार महिलेविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर शेअर करून तिची बदनामी केली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गीता बागवडे करत आहेत.

ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरला; अंडा भुर्जीवाल्याची निर्घृण हत्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button