breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

कॉलेजच्या कार्यक्रमात विद्यार्थांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देताच संतापल्या शिक्षीका! व्हि्डीओ व्हायरल

ABES College : गाझियाबादच्या सुप्रसिद्ध ABES Engineering College मध्ये ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने एका शिक्षिकेनं त्यावर तीव्र आक्षेप घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया सध्या येत आहेत.

गाझियाबादच्या ABES Engineering College च्या सांस्कृतिक कार्यक्रमात एक विद्यार्थी गाणं सादर करण्यासाठई स्टेजवर आला. समोर बसलेल्या विद्यार्थांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा द्यायला सुरूवात केली. यानंतर स्टेजवर असलेल्या विद्यार्थांनंही ‘जय श्रीराम भाई’ असा प्रतिसाद दिला.

यानंतर समोर खुर्चीवर बसलेली शिक्षीका या विद्यार्थांवर चांगल्याच भडकल्या आणि त्यांनी स्टोजवरील विद्यार्थाला चांगलच सुनावलं. तुम्ही लोक इथे घोषणाबाजी करण्यासाठी आलेले नाही आहात. हा कॉलेजचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तू आता गाणं गाणार नाही, असं या शिक्षिकेनं विद्यार्थांना सुनावलं.

हेही वाचा – नवरात्रीच्या सातव्या दिवशी नवदुर्गांपैकी कालरात्री देवीची पूजा का केली जाते? 

आपण सगळे इथे एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलो आहोत. चांगला वेळ घालवण्यासाठी आपण इथे आलो आहोत. मग इथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा का दिल्या जात आहेत? याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही शिस्तीचं पालन करा. हा कार्यक्रम तेव्हाच होईल, जेव्हा तुमच्याकडून शिस्तीचं पालन होईल. नाहीतर आम्ही भविष्यात कोणताही कार्यक्रम करणार नाही. तुम्ही एका चांगल्या कॉलेडमध्ये शिकत आहात. इतक्या चांगल्या पद्धतीने बसले आहात. मग तुमची वागणूकही चांगली असायला हवी. एबीईएसचा विद्यार्थी बसलाय आणि काहीतरी निरर्थक बोलतोय असं व्हायला नको, असंही शिक्षिका म्हणाल्या.

दरम्यान, यावरून संबंधित शिक्षिकेला कामावरून बडतर्फ करण्याचीही मागणी करण्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉलेजच्या बाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button