breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

नवरात्रीच्या सातव्या दिवशी नवदुर्गांपैकी कालरात्री देवीची पूजा का केली जाते?

Navratri 2023 : नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते. कालरात्रीचे रुप भयंकर आहे. नवरात्राची सातवी माळ रविवार, २१ ऑक्टोबर रोजी आहे. देवी भागवत पुराणानुसार, कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही.

मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार, कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे.

हेही वाचा – इस्त्रोची ‘गगनयान’ झेप, गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूलची चाचणी यशस्वी 

त्यामुळे तंत्र-मंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. कालरात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच कालरात्री देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते.

या दिवशी देवीला गूळ नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या. असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्याचे रक्षणही होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button