breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीसह समाविष्ट गावांतील वीज समस्या सुटणार!

महावितरणच्या नवीन भोसरी उपविभाग-२ ची निर्मिती

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

पिंपरी । प्रतिनिधी

समाविष्ट गावांसह भोसरी विधानसभा मतदार संघातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरणच्या भोसरी विभागातील भोसरी उपविभाग व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन भोसरी उपविभाग-२ची निर्मिती करण्यात आली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे वीज समस्येमुळे त्रस असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महावितरणकडून याबाबतचे मंगळवारी (दि. १७) परिपत्रक जारी करण्यात आले.

नव्याने तयार झालेल्या भोसरी उपविभाग-२ चे कार्यालय व त्या अंतर्गत तीन शाखा कार्यालयांमध्ये एकूण ६९ तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली आहेत. पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी विभागात यापूर्वी भोसरी, आकुर्डी व प्राधीकरण असे तीन उपविभाग होते. यात भोसरी व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभाग व त्याअंतर्गत तीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात यावी यासाठी आमदार आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा सभागृहात राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

हेही वाचा – ‘जयंत पाटील आमच्याच संपर्कात’; अजित पवार गटातील मंत्र्याचा दावा

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले की, भोसरी विभागातील भोसरी व आकुर्डी उपविभागात सुमारे २ लाख ७० हजार वीजग्राहक होते. विभाजनानंतर आता भोसरी उपविभाग-१ मध्ये ७२ हजार, भोसरी उपविभाग-२ मध्ये ६८ हजार आणि आकुर्डी उपविभागात १ लाख ३० हजार अशी ग्राहकसंख्या राहणार आहे. तसेच नवीन ६९ तांत्रिक व अतांत्रिक पदांची निर्मिती झाल्यामुळे या सर्व ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजसेवा मिळेल.

मनुष्यबळ निर्मितीमुळे कामात सुसूत्रता..

भोसरी विभागाच्या नव्या रचनेत आता भोसरी उपविभाग-१ मध्ये भोसरी गाव, चऱ्होली, नाशिक रोड शाखा आणि नवनिर्मित भोसरी उपविभाग-२ मध्ये इंद्रायणीनगर (नवनिर्मित), मोशी व स्पाईनसिटी (नवनिर्मित) शाखा तसेच आकुर्डी उपविभागामध्ये चिंचवड, संभाजीनगर व चिखली (नवनिर्मित) शाखा असे प्रत्येकी तीन शाखा कार्यालय राहतील. नव्या भोसरी उपविभाग-२ कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे ६ पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे १२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नव्या चिखली, इंद्रायणीनगर व स्पाईनसिटी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक असे प्रत्येकी १९ पदे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येईल.

भोसरी विधानसभा मतदार संघ आणि समाविष्ट गावांसह औद्योगिक पट्टयातील वीज पुरवठा यंत्रणा सुमारे ३० वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण यामुळे वीज मागणीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्या तुलनेत महावितरण प्रशासनाने पायाभूत सोयी-सुविधा नाहीत. परिणामी, वीज पुरवठ्याबाबत प्रचंड तक्रारी आणि नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधीमंडळात सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले. आगामी काळात ‘वीजसमस्या मुक्त पिंपरी-चिंचवड’ व्हावे, अशी अपेक्षा आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button