breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

स्पुटनिक व्ही लस पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होणार

नवी दिल्ली – देशात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असल्याने इतर देशातूनही वेगवेगळ्या कंपन्यांकडून लस घेण्याची मागणी करण्यात येत होती. त्यातच, रशियाच्या स्पुटनिक वी या लसीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पुढील आठवड्यापासून स्पुटनिक व्ही ही लस मिळणार असल्याची माहिती नीती आयोगाचे सदस्या डॉ.पीके वॉल यांनी दिली. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली आहे. दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे.

डॉ.पीके पॉल म्हणाले की, ‘स्पुटनिक व्ही लस भारतात आली आहे. मला सांगण्यात आनंद वाटत आहे की, पुढच्या आठवड्यापासून ही लस भारतात मिळण्यास सुरुवात होईल. रशियातून आलेल्या लशींची लवकरच विक्री सुरु होईल.’

स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली होती. आता लशीची दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. या लसीचं उत्पादन जुलै महिन्यात सुरु होईल असंही वीके पॉल यांनी सांगितलं. या लशीचे १५.६ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. तर भारतीयांसाठी ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान २१६ कोटी डोस तयार केले जातील.

भारताच्या औषध महानियंत्रकांनी जानेवारीत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्ड—अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सीरमने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली होती. स्पुटनिक व्ही लस आयात करण्याची परवानगी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मागितली होती. ही लस मे. गमालिया इन्स्टिटय़ूट यांनी तयार केली असून लशीच्या उत्पादनासाठी रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांच्याशी करार केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button