breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती सदस्यपदी शिवसेनेचे संतोष सौंदणकर यांची फेरनिवड

  • शिवसेना कार्यकर्ते आणि महावितरण कर्मचा-यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
  • ग्राहक व वीज वितरण कंपनी यांच्यात सुसंवाद ठेवण्याचे कार्य करणार – संतोष सौंदणकर

पिंपरी / महाईन्यूज

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती सदस्यपदी शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांची पुनश्च दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. राज्याच्या महावितरण कंपनीकडून त्यांना नुकतेच निवड झाल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्राहक व वीज वितरण कंपनीमध्ये सुसंवाद आणि समन्वय साधण्यासाठी तसेच महावितरणाचा कारभार पारदर्शक करण्यासाठी गेल्या टर्ममध्ये सौंदणकर यांनी मोठे कष्ट घेतले. प्रसंगी ग्राहकांना न्याय मिळवून दिला, त्यामुळेच त्यांची दुसऱ्यांदा महावितरणाच्या या जबाबदार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल संतोष सौंदणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव विनायक राऊत, मंत्री अनिल देसाई, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शैलेश परब, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिवसेना ज़िल्हा संघटिका सुलभा रामभाऊ उबाळे, राज्य वीज कर्मचारी अधिकारी-अभियंते यांचे आभार मानले आहेत.

संतोष सौंदणकर म्हणाले, वीज पुरवठा हा अंत्यत महत्वाची बाब आहे. वीज कंपनीचा कारभार प्रभावीपणे चालतो की नाही, ग्राहकांना चांगली सेवा मिळतेय की नाही, हे पाहण्यासाठी महावितरण कंपनीच्या कारभारात लोकसहभाग महत्वाचा आहे. ग्राहक व वीज वितरण कंपनीमध्ये सुसंवाद आणि समन्वय साधण्यासाठी तसेच महावितरणचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालविण्यासाठी विद्युत सनियंत्रण समिती कर्तव्य बजावते. विविध योजनांचा आढावा, विजेचा गैरवापर व तो रोखण्यासाठी प्रयत्न, पैसे भरूनही वीजजोडणी न मिळालेल्या घरगुती ग्राहकांच्या जोडण्यांचा आढावा, ग्राहकांना खात्रीशीर विद्युतपुरवठा व चांगली सेवा मिळावी यासाठी मार्गदर्शन, समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व विभाग वीजकपात मुक्त करणे, अशा विविध वीजविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी व नागरिकांना योग्य प्रकारे वीजसेवा मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे. विजेसंदर्भात पुणे जिल्ह्यातील ग्राहकांच्या कुठल्याही समस्या, कंपनी संदर्भातील तक्रारी असल्यास मला थेटपणे कळवा. त्यासाठी ९९७०००५०८९ हा मोबाईल क्रमांक २४ तास उपलब्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button