breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांच्या लॉकडाऊनआधी काढलेल्या बस पासला मिळणार मुदतवाढ

पुणे – सध्या राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ६ जूनपासून पुण्यातील पीएमपी बस सेवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ३ ,एप्रिलपूर्वी पास काढलेल्या ज्या प्रवाशांना लॉकडाऊनच्या काळात पासचा लाभ घेता आला नाही. अशा प्रवाशांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी स्वारगेट, हडपसर बसस्थानक, मनपा, डेक्कन, पुणेस्टेशन (मोलेदीना), वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपरी चैक (लोखंडे सभागृह), पिंपळे गुरव, भोसरी (शिवाजी चौक) आळंदी, सासवड, उरूळीकांचन व राजगुरूनगर आदी पास केंद्रांवर पासची मुदत वाढवून मिळणार आहे. त्यामुळे पास धारकांना २० जूनपर्यंत संबंधित पास केंद्रात जाऊन आपल्या पासची मुदतवाढ करून घ्यावी लागणार आहे. कारण २० जूननंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. पास धारकांनी अर्ज केल्यानंतरचे त्यांना मॅन्युअल आणि मी-कार्डची मुदत वाढवून मिळणार आहे. त्यासाठी पासधारकांनी अर्ज आणि मुळ पाससह संबंधित पास केंद्रातून मुदत वाढवून घ्यावी, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button