Uncategorizedपश्चिम महाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षणाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यायला पाहिजे होती – उदयनराजे

मराठा नसून देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी एवढं केलं, पण तुम्ही काय केलंत; उदयनराजेंचा सवाल

अशोकाचं झाड स्वत: वाढतं पण इतरांना सावली देत नाही

ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाची धुरा होती त्यांनी काहीच केले नाही

पुणे । महाईन्यूज ।

देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांना समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले. याउलट’पाटील’, ‘महाडिक’, ‘शिर्के’, भोसले’, अशा आडनावाच्या फक्त पाट्या लावणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले,असा सवाल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. असं बोलतात की, अशोकाचं झाड स्वत: वाढतं पण इतरांना सावली देत नाही. गेल्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली असती तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता. पण ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाची धुरा होती त्यांनी काहीच केले नाही, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तरपणे भाष्य केले. मी जातपात मानत नाही. हे जातपात करण्यापेक्षा सरसकट सर्वच जातीमधील आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिले पाहिजे. आपल्याकडे पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची व्याख्याच चुकीची केली आहे. त्याचा फटका सर्वांना बसत आहे. व्यक्ती कुठल्याही जातीमधील असू दे ना, दुर्बल घटकांना सरसकट सवलती द्या ना. तुम्ही फक्त मागासवर्गीयांनाच आरक्षण का देता, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

सत्ता का गेली याचं आत्मपरीक्षण करा; उदयनराजे भोसलेंचा सल्ला
कुठल्याही पक्षातील लोक असतील, जेव्हा ते सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येतात, ते जर काही स्वार्थाने एकत्र असतील तर त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कष्ट करावे लागतात. स्वार्थ साधल्यावर हे लोक पुन्हा आपापल्या मार्गाने निघून जातात. परंतु, विचाराने एकत्र आलेल्या लोकांना बांधून ठेवण्यासाठी वेगळी ताकद वापरावी लागत नाही. मी काही भविष्य वगैरे सांगत नाही. प्रत्येकाला वाटतं, आपण सत्तेत राहावे. पण सत्ता गेल्यावर ती का गेली याचे आत्मपरीक्षण करावे. ते केले असते तर आत्मक्लेश करायची वेळ आली नसती, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button