breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

#CoronaVirus : होस्टेलमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करा – खासदार सुप्रिया सुळे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सर्वच जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे आज (दि. 29) दुपारी 3 ते 4 दरम्यान संवाद साधला.

कोरोनाच्या संकटामुळे विद्यापीठांच्या परीक्षा आणि पुढील वर्गांचे प्रवेश याबाबतीत विद्यार्थी वर्गामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. या बाबतीत येणाऱ्या 8-10 दिवसात मुख्यमंत्री आणि तंत्रशिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर महाराष्ट्रातील विविध भागात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत ताईंनी चर्चा केली.

या प्रश्नांवर झाली महत्त्वपूर्ण चर्चा

1.RTE प्रेवशाची प्रक्रिया अर्धवट पार पडली आहे. विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाबाबतीत येणाऱ्या अडचणींमध्ये लक्ष घालायला हवे

  1. भरपूर विद्यार्थी हॉस्टेल किंवा महाविद्यालयात अडकले आहेत. त्यांच्या भोजन आणि इतर गोष्टींची व्यवस्था या बाबतीत येत असलेल्या अडचणी आणि त्यावर उपाय शोधायला हवा
  2. विध्यार्थी बाहेर देशात अडकले आहेत व जे आपल्या संपर्कात आहेत त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्रक्रिया
  3. काही शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची फी ची शेवटची इन्स्टॉलमेंट मार्च एप्रिल महिन्यात होती त्याबाबतीत शाळा महाविद्यालयांकडून तगादा सुरू झाला आहे त्या बाबतीत कारवाई करण्यासंदर्भात
  4. ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शहरी भागात अडकले आहेत त्यांनादेखील रेशन मिळावं
  5. सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अतिशय अस्वच्छ असून त्या बाबतीत कारवाई करावी
  6. काही परीक्षांचे अर्ज भरणे बाकी असून त्या बाबतीत सूट किंवा ऑनलाइन सुविधा मिळावी
  7. काही भागात भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्या येताना शहरातील लोक लपवून घेऊन येत आहेत त्यामुळे नकळतपणे ग्रामीण भागात कोरोनाचे आगमन होत आहे
  8. काही भागात सामाजिक किंवा कंपनीचे रुग्णालय उपलब्ध करता येईल या बाबतीत शासकीय पातळीवर बोलावे
  9. कोरोनाच्या बाबतीत काम करत असलेल्या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आशा वर्कर यांच्यासाठी शिव भोजन थाळीची सुविधा करता येईल का?
  10. अकोला, बुलढाणा या भागातील कोरोनाची चाचणी करण्यासाठी नमुने नागपूरला पाठवावे लागतात त्यामुळे रिपोर्ट यायला उशीर होतो या बाबतीत काही करता येईल का?
  11. अकोला भागातून परराज्यातील खूप सारे कामगार आपली कुटुंब आणि लहान मुले घेऊन चालत निघाले आहेत त्यांना अकोला भागात राष्ट्रवादी तर्फे भोजन आणि औषधांची व्यवस्था या भागातील कार्यकर्त्यांनी केली आहे याचप्रकारे पुढील जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांना देखील याबाबत सूचना द्याव्यात
  12. काही महानगरपालिका आणि जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना अमुक अमुक सूचना कराव्यात
  13. धनगर समाजातील अनेक बांधव मेंढ्या घेऊन परगावी अडकले आहेत त्यांना परत गावी येताना अडचणी येत आहेत त्या बाबतीत लक्ष घालावे
  1. रेशन दुकान काही भागांमध्ये केवळ स. 10 ते दु.2 या वेळेतच चालू आहेत. पिवळ्या रेशनकार्ड धारकांबरोबरच आता राज्य शासनाकडून केशरी रेशनकार्डधारकांना देखील धान्य मिळत असल्याने दुकानांमध्ये खूप गर्दी होत आहे लांबच लांब रांगा लागत असून लोकांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.तरी या दुकानांची वेळ वाढवण्यात यावी.
  2. सध्या 10वी व 12वी च्या शाळा व क्लास च्या vacation batch बंद आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिवसातील काही तास ऑनलाइन टिचिंगची सोय करून विद्यार्थ्यांचे वर्ग घ्यावेत.

या आणि अश्या इतर बाबतीत सुळे यांनी स्वतः लक्ष घालणार असल्याचे या चर्चेदरम्यान सांगितले. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व शक्य असेल तेवढ्या प्रमाणात आपल्या भागातील लोकांना मदत करावी व काही अडचण आल्यास राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला थेट संपर्क करावा. पण लोकांची गैरसोय होता कामा नये, असे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button