breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

राम, लक्ष्मण, जानकी! अयोध्येत राम मंदिरात स्थापन होणारी मुर्ती ठरली

Ram Mandir Ayodhya : २२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामाची मूर्ती स्थापन करून प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामलल्लाची म्हणजेच बाल रुपातील रामाची मूर्ती मंदिरात असणार आहेच. याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचीही मूर्ती मंदिरात असणार आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन ठेवली जाणार आहे.

अरूण योगीराज हे कर्नाटकमधल्या मैसूरचे आहेत. त्यांचं घराणंच मूर्तीकारांचं आहे. कारण गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होतं. अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तीकारांमधले एक प्रतिथयश मूर्तीकार म्हणून त्यांची गणना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा    –    मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून आज चार मॅरेथॉन बैठका, मनोज जरांगे पाटील म्हणाले.. 

अरुण योगीराज यांनी केदारनाथ या ठिकाणी आदी शंकराचार्यांचा १२ फूट उंचीचा पुतळाही साकारला आहे. मैसूर या ठिकाणी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्तीही त्यांनी साकारली आहे. मैसूरच्या राजाचा १४ फुटांचा पुतळाही त्यांनी तयार केला आहे. तर मैसूर या ठिकाणीच त्यांच्या हातातून निर्मिलेली हनुमानाची २१ फुटांची मूर्तीही बसवण्यात आली आहे. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फूट उंचीचा पुतळाही त्यांनी तयार केला आहे. त्यांची ही कला संपूर्ण देशात पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button