breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

विराट नौका १०० कोटीला विकणार, एन. व्ही. टेक्ट तिचे संग्रहालय बनवणार

मुंबई – आयएनएस विराट ही युद्ध नौका जतन करून तिचे संग्रहालयात रुपांतर करण्याची इच्छा मुंबईतील एन. व्ही. टेक्ट मरीन कंसल्टेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने व्यक्त केली आहे. त्यासाठी ती देण्याची मागणी कंपनीने श्रीराम समूहाकडे केली आहे. मात्र त्यासाठी श्रीराम ग्रुपने या कंपनीकडे १०० कोटींची मागणी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या जुलैमध्ये त्यांनी अवघ्या ३८.५४ कोटींना ती भंगारात विकत घेतली आहे.

१९८७ मध्ये भारतीय नौदलात सामील झालेली आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका २०१७ मध्ये नौदलातून निवृत्त झाली. त्यानंतर गेल्या जुलैमध्ये झालेल्या लिलावात श्रीराम ग्रुपने ३८.५४ कोटींना ती भंगारात खरेदी केली. त्यानंतर ही युद्धनौका तोडण्यासाठी गेल्या आठवड्यात ती गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर नेण्यात आली. तिथे ती तोडली जाणार आहे. परंतु ही ऐतिहासिक नौका तोडून काळाच्या पडद्याआड जाण्यापेक्षा संग्रहालयाच्या रुपाने ती जतन करण्याची इच्छा मुंबईतील एन. व्ही. टेक्टने व्यक्त केली आहे. देश प्रेमापोटी संग्रहालय बनवण्यासाठी ती खरेदी करू इच्छितात. त्यामुळे त्या कंपनीला विराट देण्यास मी तयार झालो. मात्र त्यासाठी त्यांना संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल, असे श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष मुकेश पटेल यांनी सांगितले. मुंबईतील ही कंपनी संरक्षण मंत्रालयाकडे विराटचे संग्रहालय बनवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी एक आठवडा वाट पाहू शकतो. परंतु जास्त वेळ नाही. त्यांनी एक आठवड्यात ही युद्धनौका खरेदी केली नाही तर ती तोडण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही पटेल यांनी सांगितले. ही युद्धनौका संग्रहालयात परावर्तीत करण्यासाठी आपण संरक्षण मंत्रालयाकडे परवानगी मागितली असून ती मिळेल, असा विश्वास एन. व्ही. टेक्टचे व्यवस्थापक व्ही. के. शर्मा यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button