breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी पुरवठा विभागात ‘अर्थपुर्ण’ वाटाघाटी; बोगस कामगार दाखवून ठेकेदाराने लाटली बिले

मजूर पुरवठा करणा-या संस्थेला काळ्यात यादीत टाका, आयुक्तांना दिले पत्र

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांच्या अर्थपुर्ण संबंधामुळे ठेकेदार संस्था नियमबाह्य कामकाज करु लागल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाला मजूर पुरवठा करणा-या संस्थेने बोगस कामगार दाखवून जादा बिले लाटली आहे. या प्रकरणी संबंधित अधिका-यासह ठेकेदार संस्थेची चाैकशी करुन काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे श्रीनिवास बिरादर यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात मे. बापदेव महाराज स्वंयरोजगार संस्थेने पाणी पुरवठा विभागात मजूर पुरवठा करण्यात येत होता. त्या संस्थेने निविदा क्रमांक 17/4/ 2016-2017 ते आजतागायत महापालिकेकडे मजूर पुरवठा करण्याचे काम केले आहे.

संबंधित संस्थेच्या ठेकेदाराने त्याच्या गावातील लोकांची नावे वापरुन 10 हून अधिक कामगारांच्या नावे महापालिकेकडून बिल अदा करुन घेतले आहे. त्यामुळे बोगस कामगार दाखवून जादा रक्कम पालिकेची लाटली आहे. तसेच मजूराचे काम करणा-या सर्वांना केवळ आठ हजार रुपये देवून इतर रक्कम ठेकेदाराने लाटली आहे. कामगारांची पीएफ व ईएसआयची सर्व चलन तपासले असता ते खोटी कागदपत्रे आढळून आली आहे. सर्व कामगारांना किमान वेतनानुसार पगार दिलेला नाही.

दरम्यान, त्या ठेकेदार संस्थेने गावातील लोकांच्या नावे मस्टर दाखवून कामगारांचे वेतन हाडप केले आहे. त्यामुळे सुमारे महापालिकेचा 20 लाखाहून अधिक रुपयाची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून रक्कम वसुल करण्यात यावी, त्या ठेकेदाराची चाैकशी करुन काळ्या यादीत टाकावे, तसेच कामगारांचा पीएफ व ईएसआय न भरल्याने त्याच्यावर फाैजदारी दाखल करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे श्रीनिवास बिरादार यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button