breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘फळबागांच्या खतासाठी १०० टक्के अनुदान मिळणार’; कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ अंतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे.

याअंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना १०० टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. या योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा – कांदा नाही खाल्ला तर कोणी मेले आहे का? बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान

तसेच राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटरद्वारे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button