breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबईतील कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, आदित्य ठाकरे घटनास्थळी पुन्हा दाखल

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुर्ल्यातील नाईक नगरमध्ये रात्री उशिरा ही ४ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत अगोदर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता या दुर्घटनेत मृतांचा आकडा हा तब्बल १० वर गेला आहे. अजय भोले पासपोर (२८), अजिंक्य गायकवाड(३४), कुशर प्रजापती(२०), सिकंदर राजभर(२१), अरविंद भारती(१९), अनुप राजभर(१८), अनिल यादव(२१), शाम प्रजापती(१८), अशी मयतांची नावं आहेत. आणि २ मृत लोकांची अजून ओळख पटली नाहीये. तर चार जणांची प्रकृती स्थिर आहे. नऊ जणांचा उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

घटना घडली त्या मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर हे सध्या इतर बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला आहेत. ही घटना कळताच त्यांनी आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी मृत आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, मतदारसंघात इतकी मोठी घटना घडली आणि तिथे जाता येत नसल्याने आमदार मंगेश कुडाळकर यांच्या डोळ्यात पाणी तरळलं, अशी माहिती बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी दिली. कुर्ला पूर्वेकडील एसटी बस डेपोच्या जवळील नाईक नगर सोसायटीयेथील चार मजली इमारत सोमवारी रात्री ११. ३० च्या दरम्यान कोसळली. यावेळी इमारतीत २० ते २५ रहिवाशी होते. ही दुर्घटना लेव्हल-३ ची असून घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली २०-२५ लोक अडकले होते. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सध्या बचावकार्य अद्याप सुरू आहे. दरम्यान, काल रात्री दुर्घटनेनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन सर्व पाहणी केली. तसेच, आज दुपारीही ते पुन्हा परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button