breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शिवसेनेचे बंडखोर गुलाबराव पाटील यांच्यावर निकटवर्तीयाचा धक्कादायक आरोप; जळगाव जिल्ह्यात खळबळ

जळगाव : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षात बंडाळी केल्यानंतर फुटलेल्या आमदारांबाबत दररोज आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ (Gulabrao Wagh) यांनी त्यांच्यावर पैसे घेऊन नगरसेवकांना कामे दिल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या आरोपामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांसह आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मंत्री, तसेच आमदारांचे समर्थक आणि निकटवर्तीय बंडखोरांच्या विरोधात रस्त्यावर उतरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे निकटवर्तीयच आमदारांची उणी दुणी काढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

धरणगाव येथील शिवसेनेच्या मेळाव्यात गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय गुलाबराव वाघ यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी पैसे घेऊनच धरणगाव नगरपालिकेतील नगरसेवकांना कामे दिली. फुकटात कामे केली असती, तर काय फरक पडला असता. मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी तसे केले नाही. त्यांनी पैसे घेतले. याचा मी साक्षीदार आहे आणि हे मी गुलाबराव पाटील यांच्यासमोर बोलण्यास देखील तयार आहे, असे गुलाबराव वाघ यांनी जाहीरपणे म्हटले आहे.

  • ‘अशा आणखी बऱ्याच गोष्टी आहेत’

अशा आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. आता याहून मोठ्या बातमीबाबत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना सोडल्यावर ते जेव्हा दुसऱ्या पक्षात जातील, म्हणजेच हिंदुस्तान पाकिस्तान झाल्यानंतर बोलू. त्या बाहेर काढू असेही यावेळी गुलाबराव वाघ यांनी स्पष्ट केले. दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्ती गुलाबराव वाघ यांनी अशा पद्धतीने धक्कादायक आरोप केल्यानंतर मंत्र्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात भविष्यात बंडखोर विरुद्ध शिवसैनिक यांच्यातील संघर्ष आणखी टोकाला जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button