ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कुत्र्याला कारचा धक्का लागल्याने टोळक्याने फोडली कारची काच

पिंपरी चिंचवड | अचानक रस्त्यामध्ये आलेल्या कुत्र्याला कारचा धक्का लागल्याने, 8 – 10 जणांच्या टोळक्याने कारचालकाला मारहण करून कारची काच फोडली. पिंपरी येथील काळेवाडी रोडवरील खुशी हॉटेल समोर गुरुवारी (दि.09) ही घटना घडली.याप्रकरणी नितीन श्रावण पाटील (वय 46, रा. अष्टविनायक कॉलनी, वाकड ) यांनी शुक्रवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8 – 10 अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन हे आपल्या कारमधून जात असताना अचानक रस्त्यामध्ये आलेल्या कुत्र्याला कारचा धक्का लागला. फिर्यादी यांनी कार थांबवली असता त्याठिकाणी 8 – 10 अनोळखी इसम गोळा झाले. आरोपी यांनी फिर्यादी यांना गाडी कशी चालवतो ? अशी दमदाटी केली तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. कारवरती काठी आणि दगड मारले व कारची मागील बाजुची काच फोडली‌. असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button