breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Oppo चा नवा बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या फिचर्स?

मुंबई – सध्या सर्वच स्मार्टफोन कंपन्या आपले 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. आता Oppo ने आपला A53 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन Oppo A53 चाच 5G वर्जन आहे. कंपनीने हा फोन 2 रॅम आणि 3 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. सध्या Oppo ने आपला हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा बजेट 5G फोन भारतातही लॉन्च केला जाणार आहे.

Oppo A53 5G च्या 4GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत जवळपास 14,600 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच याच्या 6GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. युजर्सना हा फोन ग्रीन, सीक्रेट नाईट ब्लॅक आणि स्ट्रीमर पर्पल ऑप्शनसोबत खरेदी करता येणार आहे.

Oppo A53 5G चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोअर MediaTek Dimensity 720 प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या 4G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर देण्यात आला होता. हा स्मार्टफोन अॅन्डॉईड 10 ColorOS 7.2 वर आधारित असणार आहेत. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटसोबत 6.5 इंचाचा फुल-HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीच्या 5G स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. फोनमध्ये 4,040mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16MP प्राइमरी सेंसर, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP पोट्रेट सेंसर युर्सना देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची इंटरनल मेमरी 128GB आहे. यामध्ये साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनसोबत स्पर्धा

Oppo A53 5G ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये अनेक 5G स्मार्टफोन अस्तित्त्वात आहे. यामध्ये google pixel 4A 5G, Realme 7 5G, Vivo X 60 आणि Moto G 5G यांसारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button