breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीच्या वाढीव खर्चाला दिलेल्या मंजुरीची चाैकशी करा

माजी नगरसेवक मारुती भापकर यांची आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेने 23 व 30 डिसेंबरच्या बैठकीत 30 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला स्थगिती देऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

महापालिकेत सत्ता नव्हती, त्यावेळी आयत्या वेळचे विषय व वाढीव खर्चास भाजपचा विरोध असायचा, आता तेच मान्यता देत आहेत. त्यावेळचे सत्ताधारी व विद्यमान विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनाही गप्प असून अशा कामांना मुकसंमती देत आहे. अशाप्रकारे ऐन वेळच्या कोट्यवधी रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी म्हणजे करदात्यांच्या तिजोरीवर संगनमताने टाकलेला दरोडाच म्हणावा लागेल. त्यामुळे या सर्व विषयांना स्थगिती देऊन अंदाजित खर्च निश्‍चित करणारे अधिकारी, पदाधिकाऱ्यांची चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, असेही भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

वाढीव खर्चाचे मंजूर विषय

  • थेरगाव बापूजी बुवानगरमधील रुग्णालयाच्या कामासाठी आयत्या वेळी 14 कोटी 30 लाख
  • बिजलीनगर- गुरुद्वारा रस्त्यावरील भुयारी मार्गासाठी चार कोटी 50 लाख रुपये
  • भोसरीतील चर बुजवण्याच्या कामात सीडी वर्कसाठी (नाल्यावर स्लॅब टाकणे) सात कोटी 50 लाख
  • महापालिका कार्यशाळा विभागातील कामांसाठी दोन कोटी 10 लाख रुपये
  • दफनभूमीसाठी काळजी वाहक पुरवण्यासाठी 30 लाख 16 हजार रुपये
  • औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर पार्क स्टीटसमोर बांधण्यात येणाऱ्या सब-वेसाठी 96 लाख 97 हजार
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button