breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विविध विकास कामांसाठी 87 कोटींच्या खर्चाला स्थायीची मान्यता

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ८७ कोटी २२ लाख खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रेफ्रिजरेशन व एयर कंडीशनिंग मेकॅनिक या व्यवसायाचे नुतनीकरण व अद्यावतीकरण करण्यासाठी येणाऱ्या ४ कोटी ७० लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग १५ मधील गणेश तलावामधील गाळ काढणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या सुमारे ४२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग १ चिखली येथील शेलारवस्ती व सोनवणेवस्ती परिसरात जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणा-या सुमारे ५५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चऱ्होली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग २ येथे चिखली गावठाण, कुदळवाडी, बालघरेवस्ती, पवारवस्ती, पेठ प्रभाग १६, मोशी, बोऱ्हाडेवाडी, संजयगांधीनगर, बोऱ्हाडेवस्ती येथे आवश्यकतेनुसार जुन्या मलनि:सारण नलिका बदलणेकामी येणा-या सुमारे ५५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग ८ येथील तिरुपती चौक येथील तुलसी हाईट्स समोरील रस्ता ते पेठ १ ला नाशिक हायवेपर्यंत जोडणारा १२ मीटर डीपी रस्ता विकसित करणेकामी येणा-या सुमारे ६ कोटी ८२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग ३१ मधील रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे ३ कोटी ३७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग ३१ मधील क्रांती चौक ते शनि मंदीर पर्यंतचे रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करणेकामी येणा-या सुमारे ३ कोटी २९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. शहरातील बहुतांश प्रभागातील विकास कामांसाठी येणा-या एकूण 87 कोटी 22 लाख रुपयांच्या खर्चास स्थायीने मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button