breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील बंदी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली – कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवर घातलेली बंदी डीजीसीएने आज ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली. या बंदीची मुदत ३१ ऑगस्टला संपणार होती. मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन तिला मुदतवाढ देण्यात आली आहे.

परदेशातून भारतात येणारी प्रवासी विमाने आणि भारतातून बाहेर जाणारी प्रवासी विमाने यांच्या उड्डाणांना डीजीसीएने कोरोनामुळे बंदी घातली होती. ती आता पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. मालवाहतूक आणि काही ठिकाणच्या प्रवासी वाहतुकीला परवानगी आहे. मात्र सरसकट आंतरराष्ट्रीय विमानांना अजून परवानगी मिळालेली नाही. २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्याला आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदत येत्या ३१ ऑगस्टला संपणार होती. मात्र ती पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button