breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अमोल मिटकरींचं मोठं विधान

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना वारांवार पक्षात डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची भेट घेतली होती. यानंतर त्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच्या घडामोडी तुम्ही बारकाईने पाहत असाल, तर बऱ्याच प्रमाणात भारतीय जनता पार्टीकडून पंकजा मुंडे यांना वारंवार अपमानस्पद वागणूक दिली जात आहे. परवा कारखान्याची निवडणूक झाली, तेव्हा दोघंही बहीण-भाऊ समंजस्याने एकत्र आले. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, पंकजा मुंडे राष्ट्रवादी पक्षात येतील. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्राचं नेतृत्व आहेत. त्यामुळे त्या आपल्या पक्षात असाव्यात, असं प्रत्येकाला वाटलं. त्यामुळे मलाही वाटतं की, त्या आमच्या पक्षात असाव्यात.

हेही वाचा – औरंगजेबच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांचा संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले..

बीआरएस ही अफूची गोळी आहे. बीआरएस हे नवीन गुलाबी वादळ आहे. बीआरएस किंवा एमआयएमने पंकजा मुंडेंना काय ऑफर द्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या ऑफरला पंकजा मुंडे भाळतील आणि बीआरएसच्या गळाला लागतील, असं मला वाटत नाही. बीआरएसच्या गळाला जे लागले आहेत, त्यांचं महाराष्ट्रात भविष्य चांगलं नाही. कारण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी बीआरएसला अद्याप महाराष्ट्रातला चेहरा दिला नाही. त्यामुळे हे गुलाबी वादळ आहे, काही दिवसांत शांत होईल. मात्र पंकजाताई थोड्याच दिवसात त्यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतील, हे भाजपामध्ये फक्त चंद्रशेखर बावनकुळेंनाच माहीत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.

राष्ट्रवादीत मुख्यमंत्री कुणाला करायचं? हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. मला जेवढं माहीत आहे, त्यानुसार बहुजन समाजात ओबीसीसाठी मोठा लढा उभारणाऱ्या गोपीनाथराव मुंडेंच्या त्या कन्या आहेत. त्या महाराष्ट्रात लीड करू शकतात. त्या कणखर नेतृत्व आहे. त्या आमच्या पक्षात आल्या तर आमच्या पक्षाचं बळ नक्कीच वाढणार आहे. राहिला प्रश्न मुख्यमंत्रीपदाचा तर तो सर्वस्वी निर्णय हा शरद पवारांचा असतो, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button