आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी-चिंचवड शहरात 14 लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात पालिकेच्या 69 आणि 132 खाजगी केंद्रांवर आतापर्यंत 14 लाख पेक्षा अधिक कोविड 19 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यात 10 लाख 40 हजार 442 लाभार्थ्यांना पहिला तर तीन लाख 70 हजार 274 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत 14 लाख 10 हजार 716 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड 19 लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 16 जानेवारी 2021 पासून 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लसीकरण मोहिमेने चांगली गती घेतली. या दोन महिन्यात सुमारे आठ लाख लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

आरोग्य सेवा देणाऱ्या 32 हजार 597 लाभार्थ्यांना पहिला तर 24 हजार 570 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण 57 हजार 167 आरोग्य सेवा देणाऱ्या लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.फ्रंट लाईन वर्कर असलेल्या 47 हजार 21 लाभार्थ्यांना पहिला तर 33 हजार 444 लाभार्थ्यांना दुसरा एकूण 80 हजार 465 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील पाच लाख 74 हजार 647 लाभार्थ्यांना पहिला तर 51 हजार 874 लाभार्थ्यांना दुसरा डोस असा एकूण सहा लाख 26 हजार 521 लाभार्थ्यांना लसीचा डोस मिळाला आहे.

वय 45 ते 60 वर्ष वयोगटातील दोन लाख 37 हजार 904 जणांनी पहिली आणि एक लाख 51 हजार 79 जणांनी दुसरी अशी तीन लाख 88 हजार 983 लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.वयाच्या 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील एक लाख 48 हजार 273 लाभार्थ्यांना पहिला तर एक लाख नऊ हजार 307 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस अशी एकूण दोन लाख 57 हजार 580 लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button