breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

गौतमी पाटीलची टोलेबाजी; म्हणाली, मला चांगलं म्हणतात त्यांना..

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तिने सादर केलेल्या नृत्यावर महिलाही थिरकल्या. यावेळी गौतमी पाटीलने तिला चांगले म्हणारे आणि चांगलं न म्हणणारे अशा दोन्ही वर्गावर भाष्य करत टोलेबाजी केली.

ज्याचे त्याचे विचार असतात दादा. आज काही लोक एक बोलत आहेत, तर काही लोक दुसरंच काही तरी बोलत आहेत. मला जे चांगलं म्हणतात त्यांना मी धन्यवाद करते आणि जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना बाय बाय, असं गौतमी पाटील म्हणाले.

माझ्या प्रत्येक शोला पुरूषांची संख्या अधिक असते. आज महिलांची संख्या अधिक होती. महिलाही माझ्या नृत्याचा आनंद घेत होत्या. मी एकटीच नृत्य करत होती असं नाही. त्यामुळे मला खूप खूप छान वाटत आहे, अशी भावना गौतमी पाटीलने व्यक्त केली.

माझा हा पहिलाच गौरव पुरस्कार आहे. मी पुरस्कार देणाऱ्या आपली सखी, आपला आवाज मंचाचे आभार मानते. त्यांनी मला इथं बोलावलं आणि इतका मानसन्मान दिला. आज जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या दिवशी मला बोलावून पुरस्कार दिला, त्याबद्दल धन्यवाद मानते, असंही गौतमी म्हणाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button