breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप यांनी घेतली आमदारकीची शपथ

धंगेकरांनी शपथविधीवेळी आपल्या नावापुढे लावलं आईचं नाव

मुंबई : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपा आमदार अश्विनी जगताप यांचा आज विधीमंडळात शपथविधी झाला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांना शपथ दिली.

चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील घेतली पद आणि गोपनियतेची शपथ.

शपथ घेताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने.., असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button