breaking-newsक्रिडा

IPL 2018 : हैदराबादचा दिल्लीवर 7 गडी राखुन विजय

हैदराबाद – ऍलेक्‍स हेल्स आणि शिखर धवन यांच्या भागीदारी आणि केन विल्यम्सन व युसुफ पठानच्या वेगवान खेळीने सनरायजर्स हैदराबादने 3 गडी बाद 165 धावा करुन दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 7 गड्यांनी पराभव करत गुणतालीकेत पहिला क्रमांक मिळवला आहे.

SunRisers Hyderabad

@SunRisers

And we chased down another score to maintain our top of the table position.

हैदराबदने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबच्या हेल्स आणि धवन यांनी 9 षटकात 76 धावांची भागीदारी करत आक्रमक सुरूवात केली. आवेश खानच्या दुसऱ्या षटकात ऍलेक्‍स हेल्सचा झेल ग्लेन मॅक्‍सवेलने सोडला. त्यावेळी हेल्स 9 धावांवर होता. त्यानंतर त्याने फटकेबाजी करत सहाव्या षटकात शिखर धवन आणि ऍलेक्‍स हेल्स यांनी प्रत्येकी दोन षटकार फटकावत तब्बल 27 धावा फटकावल्या. अमित मिश्राने ऍलेक्‍स हेल्सला त्रिफळाचीत करत हैदराबादला पहिला धक्का दिला.

SunRisers Hyderabad

@SunRisers

Shot finishes the innings playing a Captain’s knock as won the match by 7 wickets and 1 ball remaining

हेल्सने 31 चेंडूंत प्रत्येकी तीन चौकार आणि षटकार लगावत 45 धावा केल्या. तर मिश्राने त्याच्या पुढील षटकातच धवनला त्रिफळाचीत करत हैदराबादला मोठा धक्का दिला. धवनने 30 चेंडूंत 2 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावा केल्या. त्यानंतर केन विल्यम्सन आणि मनिश पांडेने 6 षटकात 46 धावांची भागीदारी केली. हे दोघे सामना जिंकवून देणार असे वाटत असताना पांडे 21 धावा काढुन बाद झाला. त्यानंतर आलेल्या युसूफ पठानने 12 चेंडूत 27 धावा करत हैदराबादला सहज विजय मिळवून दिला.

तत्पुर्वी, पृथ्वी शॉचे तुफानी अर्धशतक आणि श्रेयस अय्यरची फटकेबाजी पाहता दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ जवळपास दोनशे धावा करेल, असे वाटत होते. पण हे दोघे बाद झाले आणि दिल्लीची धावगती मंदावली. त्यानंतर अन्य फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही आणि दिल्लीला 163 धावांवर समाधान मानावे लागले. पृथ्वीने 36 चेंडूंत 65 धावा केल्या. श्रेयसने 36 चेंडूंत 44 धावा केल्या.

नवा सलामीवीर मॅक्‍सवेल केवळ 2 धावांवर बाद झाल्याने दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. परंतु पृथ्वी शॉने स्पर्धेतील दुसऱ्या अर्धशतकाची नोंद करताना कर्णधार श्रेयस अय्यरच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 8.3 षटकांत 86 धावांची झंझावाती भागीदारी रचून दिल्लीचा डाव सावरला. आयपीएलमध्ये दोन अर्धशतके झळकावणारा पृथ्वी शॉ हा वयाने सर्वांत लहान खेळाडू ठरला. विजय शंकरच्या 13 चेंडूंत नाबाद 23 धावांमुळे दिल्लीला 20 षटकांत 163 धावांची मजल मारता आली.

IndianPremierLeague

@IPL

Match 36. It’s all over! Sunrisers Hyderabad won by 7 wickets http://bit.ly/IPL2018-36 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button