breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Sania Mirza Retirement : सानिया मिर्झाचा अखेर टेनिसला अलविदा

दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये खेळणार शेवटचा सामना

मुंबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिसमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती शेवटची खेळनार आहे. सानियाने याबाबत माहिती दिली आहे. तिच्या या निर्णयामुळे तिचे अनेक चाहते निराश झाले आहेत. सानियाने दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे.

दुबईत होणाऱ्या टेनिस चॅम्पियनशिप 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा WTA 1000 (Women’s Tennis Association) कार्यक्रम असेल. या स्पर्धेत सानिया शेवटचा सामना खेळणार आहे.

36 वर्षीय सानिया मिर्झा दुहेरीत जगातिल एक नंबरची खेळाडू आहे. सानिया गेल्या वर्षीच घोषणा केली होती की ती 2022 च्या अखेरीस निवृत्त होणार आहे. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. अशा परिस्थितीत सानिया मिर्झा या वर्षातील पहिली ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती टेनिसला अलविदा करणार आहे.

सानिया मिर्झाने आत्ता पर्यंत जिंकलेले पुरस्कार :

अर्जुन पुरस्कार २००४, पद्मश्री पुरस्कार २००६, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१५ आणि पद्मभूषण पुरस्कार २०१६, ऑस्ट्रेलियन ओपन २०१६, विम्बल्डन २०१५ आणि यूएस ओपन 2015, मिश्र दुहेरीत तीन ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन २००९, फ्रेंच ओपन २०१२ आणि यूएस ओपन २०१४

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button