breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीत केजरीवाल समर्थकांचा मोठा मोर्चा

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचीही साथ 
मेट्रो स्टेशन्स बंद, मध्य दिल्ली विस्कळीत 
नवी दिल्ली – राज्य सरकारची असहकार्य करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांच्या विरोधात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाच्या समर्थनार्थ आम आदमी पक्षाच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी काल बंदी आदेश झुगारून पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढला. तथापी हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. या निदर्शकांना जंतरमंतर येथे जाण्याच भाग पाडण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केजरीवालांच्या आंदोलनाला पुर्ण पाठिंबा व्यक्त करीत आज या मोर्चात सहभाग घेतला.

या आंदोलनामुळे मध्य दिल्ली जवळपास ठप्प झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. दिल्ली मेट्रोची पटेल चौक, उद्योग भवन, सेंट्रल सेक्रेटरिएट, जनपथ, लोककल्याण मार्ग अशी अनेक स्थानके आज बंद ठेवण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी आजचे हे आंदोलन लक्षात घेऊन जमावबंदीचा आदेश लागू केला होता. केजरीवालांच्या या आंदोलनाला कॉंग्रेस वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा जाहीर झाला आहे. या आंदोलनात हस्तक्षेप करण्याची सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. अधिकाऱ्यांच्या चार महिन्यांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे सरकारला काम करणे अशक्‍य झाले असून अशा स्थितीत एक दिवस तरी काम करून दाखवा असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांना ट्विटरवरून दिले आहे. त्यांचे धरणे आंदोलन आज सातव्या दिवशीही सुरूच होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button