breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

SSC Result: उद्या दहावीचा निकाल कसा आणि कुठे पाहाल?

पुणे: बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्या (29 जुलै) दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उद्या बुधवार 29 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा पार पडलेली होती.

‘या’ संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जावे.

त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागणार आहे.

यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.

निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button