टेक -तंत्र । उद्योग । व्यापारपाटी-पुस्तकव्यक्तीविशेष : आर्टिकल

शिक्षण विश्व: Instrumentation Engineering बहुआयामी उपकरणीकरण शाखा!

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आधुनिक शिक्षणाची सुवर्णसंधी

आजच्या २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जग तंत्रज्ञानात जसे जसे पुढे जात आहे, तसेच त्याची स्रोत ची मागणी पण वाढत आहे. आज-काल एकच भाषा, एकाच विषयाचे ज्ञान याना फारसे महत्त्व नाही. ज्ञानाचा परीघ हा विस्तारलेलाच हवा. आणि हे शक्य आहे फक्त बहुआयामी (multidisciplinary) अभ्यासक्रमा मधेच !

असा हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकरणीकरण (Instrumentation Engineering) अभियांत्रिकी शाखेत उपलब्ध आहे. या शाखेची व्याप्ती अशी की, प्रोसेस अँड ऑटोमेशन, रोबोटिक्स, अग्रीकल्चर, बायोमेडिकल अश्या विविध क्षेत्रात लागणाऱ्या यंत्रांची माहिती या एका शाखेत आहे. या शाखेत शिक्षण घेणारा विद्यार्थी वरील सर्व क्षेत्रांची माहिती आत्मसात करू शकतो आणि नौकरीच्या दृष्टीने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. तसेच काळाची गरज म्हणून विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारचे कौशल्य आत्मसात व्हावे या दृष्टीने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो.

या अभ्यासक्रमा मध्ये महत्वाचे सहा विभाग आहेत प्रक्रिया आणि स्वयंचलन (Process & Automation), सेन्सर्स, रोबोटिक्स, एम्बेडेड सिस्टिम्स, कंट्रोल सिस्टिम आणि बायोमेडिकल !

 प्रक्रिया आणि स्वयंचलन (Process & Automation) या विषयात प्रोसेसेस कश्या सुरु होतात त्यांना ऑटोमॅटिक करण्यासाठी कोणते हार्डवेअर अशी सर्व माहिती आहे. आज काल प्रत्येक कामासाठी मानवी बलाचा वापर न करता स्वयंचलन हा परवलीचा शब्द बनला आहे आणि या क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व्यावसायिक संस्था जसे की जॉन्सन कंट्रोल, टोयो, इमर्सन, टाटा हनीवेल इत्यादी आस्थापनांमध्ये काम करून अनुभव घेण्याची संधी मिळू शकते.

रोबोटिक्स – हा तर २१व्या शतकातला एक्दम हवा हवा सा विषय ! रोबोट म्हणलं कि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा प्रकार ! उपकरणीकरण शाखेत रोबोटिक्स हा विषय सुद्धा सामाविष्ट आहे. या विषयाची व्याप्ती विध्यार्थ्यांना नोकरी, उच्चशिक्षण आणि संशोधन क्षेत्रातहीसंधी उपलब्ध करून देऊ शकते. रोबोट चे स्वयंचलन, प्रोग्रामिंग, विविध उपयोग याचा पाया या विषयात तयार होतो. या ज्ञानाच्या आधारे पारी रोबोटिक्स सारख्या ख्यातनाम कंपनी मध्ये नोकरी ची संधी मिळू शकते.

एमबेडेड सिस्टिम एकविसावं शतक असं आहे कि, आज वापरलेली वस्तू, उद्या अजून वापरायला सोपी उपलब्ध असते. जसा आज वापरलेला मोबाइल, उद्या अजून नवीन वैशिष्ट्यासह आपल्याला दिसतो. या एका छोट्या मोबाइल मध्ये आज आपल विश्व सामावल आहे. हा मोबाइल या एम्बेडेड विषयाच एक उदाहरण यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचा समन्वय कसा साधावा याचे सखोल ज्ञान दिले जाते आणि अश्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या कक्षा रुंदावल्या जातात.

कंट्रोल सिस्टिम – आजकाल आपल्या घरात रोजच्या वापरातल्या वस्तूही ऑटोमॅटिक आहेत. जसे वॉशिंग मशीन, माइक्रोवेव्ह इ. या वस्तूंचे नियंत्रण कंट्रोल सिस्टिम या विषयाद्वारे आत्मसात करता येते. कमीतकमी किमतीत या वस्तू बनविता आणि वापरता येऊ शकतील का या बाबतचे ज्ञान या विषयातून दिले जाते. या माहिती आधारे विद्यार्थ्यांना फिलिप्स, LG, सारख्या नामांकित कंपनी मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

सेन्सर्स – हा विषय तर उपकरणीकरण शाखेचा पाया म्हणून गणला जातो सर्व प्रकारचे नियंत्रण, स्वयं चलन हे योग्य सेन्सर्स शिवाय शक्यच नाही. योग्य सेन्सर्स ची निवड हा प्रत्येक प्रोजेक्ट चा जणू गाभाच ! अशा या विस्तारित सेन्सर जगताची माहिती या विषयात मिळते. सेन्सर्स चे ज्ञान विद्यार्थ्यांना स्वयंचलित प्रक्रिया राबविण्या साठी उपयुक्त ठरू शकते. अद्ययावत सेन्सर्स ची घडण या प्रक्रिया ला प्रोजेक्ट आणि रिसर्च मध्ये भरपूर मागणी आहे. हा विषय उपकरणीकरण शाखेत समाविष्ट केलेला असून विद्यार्थ्यांचा आवडता बनला आहे.

 बायोमेडिकल – जोपर्यंत जीवसुष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत या विषयाची जडण घडण मानवाला सहाय्यक राहील या विषयात जीविताची सुरक्षा करणाऱ्या सर्व प्रकारच्या यंत्रांची माहिती आहे. सध्या सि.टी. स्कॅन, एम. आर. आय, एक्स-रे, सोनोग्राफी या सर्व प्रक्रिया अतिशय गरजेच्या झाल्या आहेत या यंत्रांच्या इन्स्टॉलेशन पासून रुग्णांवर वापर होई पर्यंत सर्व कामे उपकरणीकरण अभियंता करू शकतो या प्रक्रियांची माहिती बायोमेडिकल या विषयात आहे. या शाखेतील विद्यर्थ्यांना फिलिप्स हेल्थ केअर, एल. जी हेल्थ केअर, Mediray, Dragger इ नामांकित कंपनी मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत तसेच या यंत्रांची सर्विसिन्ग आणि मेन्टनन्स साठी स्वतःचा व्यवसाय पण सुरु करू शकतो.

अशी हि बहुआयामी शाखा विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरी च्या संधी उपलब्ध करून देऊ शकते तसेच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग आकुर्डी मध्ये उपकरणीकरण शाखा १९९३ पासून कार्यरत आहे. समर्पित शिक्षक वृंद आणि हरहुन्नरी विद्यार्थी यांच्या सहभागाने ही शाखा उत्तरोत्तर प्रगती करेलच विविध विषयांवर आधारित प्रोजेक्ट आणि विविध कंपन्यांमध्ये नियुक्ती, विद्यार्थ्यांचे सखोल तांत्रिक ध्यान दर्शवतो. अशा प्रकारे या शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित होईल.

  • सौ. आरती अजय उटीकर
    सहयोगी प्राध्यापक, उपकरणीकरण विभाग,
    डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी पुणे-४४
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button