Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात

शिक्षण विश्व: स्त्री शिक्षण व समाज सुधारकांचा गौरव

पिंपरी-चिंचवड : संत साई हायस्कूल, भोसरी येथे स्त्री शिक्षणाच्या प्रणेते आणि समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक व विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण, धूप-दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाविषयीचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांनी स्त्रियांचे विश्वातील योगदान महत्त्वपूर्ण असून त्याला सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य सदैव स्मरणीय राहणार असल्याचे सांगितले.

शिवलिंग ढवळेश्वर यांनी विशेष करून सांगितले की, “एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होते. स्त्री स्वावलंबी झाली तर समाजातही सकारात्मक बदल घडतात.” त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत, वाचनाला जास्तीत जास्त वेळ देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. शिक्षिका पूजा पावटेकर यांनी सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याचे गौरव करत विधवा, परित्यक्ता व अनाथांसाठी केलेल्या कार्याचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन मालन लिगाडे आणि आभार प्रदर्शन रिया पोतदार यांनी केले.

हेही वाचा –  ‘ईव्हीएम व स्ट्रॉंग रूम सुरक्षा काटेकोर ठेवा’; श्रावण हर्डीकर

कार्यक्रमात लहान विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची आठवण करून देणारी विशेष सादरीकरणे केली. त्या कपाळावर आडवी चीर बांधून, हातात पुस्तके घेऊन सावित्रीबाईंच्या वेशभूषेत समूह नृत्य आणि स्वयंरचित कविता सादर करत दिसल्या.

कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन करून करण्यात आली. या वेळी शाळेच्या विश्वस्त पायल ढवळेश्वर, मुख्याध्यापिका सुनिता ढवळेश्वर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले जयंतीसह बालिका दिन साजरा करून शाळेने स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचे संदेश विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button