पुण्यातील अतिक्रमण आणि अवैध उत्खनन प्रकरणी बावनकुळे आक्रमक, 3 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Chandrashekhar Bawankule : पुणे शहरातील अतिक्रमण, अवैध उत्खनन प्रकरणी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी पुढच्या तीन दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.
हेही वाचा – खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, पुणे शहरातील कात्रज, कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटींग करुन विकणे तसेच अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करा असे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत. मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत बांधाकामाबरोबरच पुणे शहरात अनेक ठिकाणी अतिक्रण करण्यात आलं आहे. याविरोधात नागरिकांकडून कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, शहरामध्ये सर्वच भागांमध्ये रस्त्यावर, पादचारी मार्गांवर छोट्या-मोठ्या टपरी, स्टॉल यांची संख्या वाढत आहे. त्याविषयी पुणेकरांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर महापालिकेने गोपाळकृष्ण गोखले रस्ता, माणिकबाग, सिंहगड रस्ता, वडगाव शेरी, खराडी भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली होती.