breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

उत्तर प्रदेशसाठी संघाची बैठक; सरसंघचालक मोहन भागवत यांचीही उपस्थिती

नवी दिल्ली |

उत्तर प्रदेशमधील राजकीय स्थितीचा आढावा घेणारी चर्चेची दुसरी फेरी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे समजते. सरसंघचालक गुरुवारी दिल्लीत येणार असून संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आठ महिन्यांनंतर विधानसभेची निवडणूक होणार असून, यासंदर्भात गेल्या आठवड्यात संघ व भाजपच्या नेत्यांमध्ये चिंतन बैठक झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर राज्यातील मंत्री आणि प्रदेश नेते नाराज असून लखनौमध्ये दोन दिवस राष्ट्रीय पक्षसंघटक बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाताळणीवरून योगी प्रशासन पक्षांतर्गत टीकेचे धनी झाले आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या नेत्यांमध्ये मंथन होणार असून सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्यासह सर्व सहकार्यवाहही उपस्थित राहणार आहेत. भागवत काही दिवस दिल्लीत असतील व त्यांच्या अनौपचारिक बैठक होणार असल्याचे समजते. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तसेच ऑक्टोबरमध्ये हिमाचल प्रदेश व डिसेंबरमध्ये गुजरातमध्येही भाजपला निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. पंजाब वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. या निवडणुका होत असलेल्या राज्यांतील करोनाची स्थिती व संभाव्य राजकीय परिणामांच्या पार्श्वभूमीवर संघाच्या मदतकार्यांचा आढावा संघाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button