breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीला तिरंगा झेंड्यातील ३ रंगाच्या फळांची व फुलांची सजावट

पुणे : अष्टविनायकापैकी  प्रसिद्ध असलेले  श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथे  संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक  सोमवारी (ता.१५ ) दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते.

आज या शतकातील दुग्धशर्करा योग आहे. संकष्ट चतुर्थी व भारत देशाचा ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आहे. या सुवर्ण योगाचे औचित्य साधून, श्री चिंतामणी गणपती तिरंगा झेंड्यातील ३ रंगाच्या फळांची व फुलांची आरास युवा नेते युवराज काकडे यांच्या वतीने करण्यात आली होती.

मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, काजूगर, कोकम, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेते बसले होते. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांच्या दुकानावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती.

मागील तीन दिवस सुट्टी आल्याने भाविक मोठ्या संख्येने चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आगलावे यांच्या हस्ते ‘श्रीं’ ची पूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची आरास, पायघड्या सावलीसाठी मंडप व्यवस्था तसेच भाविकांसाठी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी भाविकांना देवस्थानच्या वतीने उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच थेऊर ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. आनंद महाराज तांबे हे मंदिर परिसरात लक्ष देऊन होते.

Decoration of fruits and flowers of 3 colors of tricolor flag to Shri Chintamani Ganapati at Theur
Decoration of fruits and flowers of 3 colors of tricolor flag to Shri Chintamani Ganapati at Theur
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button