breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेचे स्थापत्य अभियंते शहाजी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेच्यारी, ( रस्ते डांबरीकरणाचे काम सुरू असताना अंगावर डांबर उडून एकजण जखम झाला आहे. याला जबाबदार ठरलेल्या महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य अभियंते शहाजी गायकवाड आणि ठेकेदारावर चिखली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी सचिन उध्दव शिंदे (वय 34, रा. यशवंत कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सचिन शिंदे यांचा गॅरेजचा व्यवसाय असून ते 6 ऑक्टोबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या गॅरेजकडे दुचाकीवर जात होते. दरम्यान, चिखलीतील साने चौकात महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होते. कामगार रस्त्यावर डांबर टाकत असताना डांबर सचिन शिंदे यांच्या मानेवर उडाले. त्यामध्ये शिंदे चांगलेच जखमी झाले. त्याठिकाणी पालिकेचे अभियंते शहाजी गायकवाड उपस्थित होते. मुळात डांबरीकरणाचे काम रात्री होणे अपेक्षीत होते. कारण, हा रस्ता रहदारीचा असल्याने दिवसा काम करणे शक्य नसल्याचे माहित असताना देखील अधिका-यांनी हे काम होऊ दिले. त्यासाठी वाहतूक पोलीस शाखेची परवानगी घेतलेली नाही.

अभियंते गायकवाड आणि संबंधित काम करणा-या ठेकेदाराने नागरिकांच्या सुरक्षिततेची कसलीही काळजी घेतली नाही. त्यामुळे शिंदे यांनी त्यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्यावर आज गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यास एवढा विलंब कसा लागला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button