breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमुंबईराजकारणराष्ट्रिय

“लखमीचंद आर्य क्लिनिक” चे निगडीत लोकार्पण

“लखमीचंद आर्य क्लिनिक” चे निगडीत लोकार्पण

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
लखमीचंद आर्य सोशल वेलफेअर फाऊंडेशनद्वारा त्यांच्या दुसऱ्या नवीन “लखमीचंद आर्य क्लिनिक” चे ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकचे व्यवस्थापन व वित्तपुरवठा लखमीचंद आर्य समाज कल्याण फाऊंडेशन (एलएएसडब्ल्यूएफ) द्वारा केला जातो. क्लिनिकमधील डॉक्टर्स विनामूल्य सल्ला देतील आणि निदान झालेल्या आजारासाठी क्लिनिक औषधांचे वितरण करेल.
एलएएसडब्ल्यूएफ ही एमआरसी ग्रुप ऑफ कंपन्यांची, म्हणजेच एमआरसी लॉजिस्टिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि एमआरसी ट्रान्सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांची सामाजिक कल्याण शाखा आहे. हा समूह गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असून याने वाहतूक रसद आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन या व्यवसायात विश्वासार्ह स्थान प्राप्त केलेले आहे.

संस्थापक आणि अध्यक्ष श्री राजपाल आर्य यांना समाजास काही परतफेड करावीशी वाटली म्हणून, त्यांनी त्यांचे स्वर्गीय वडील श्री. लखमीचंद आर्य यांच्या नावावर त्यांनी एलएएसडब्ल्यूएफ या विना-नफा कंपनीची स्थापना केली. ही संस्था एका दशकापासून अस्तित्त्वात आहे आणि गरजू आणि गरीब लोकांसाठी विविध समाज सेवा कार्यात कार्यरत आहे. ही संस्था रक्तदान शिबिर, विविध वैद्यकीय शिबिरे, कोविड कालावधीत ऑक्सि मीटरच्या पुरवठा, अनाथाश्रमांसाठी आणि वृद्धाश्रमांसाठी देणगी अशा विविध सामाजिक सेवा कार्यात सक्रिय आहे.

ट्रान्सपोर्ट नगर भागात सुरू झालेले क्लिनिक है एलएएसडब्ल्यूएफचे दुसरे क्लिनिक आहे. येथे सल्ला देण्यासाठी पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध असतील आणि निर्धारित औषधे विनामूल्य दिली जातील क्लिनिकची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०७.०० अशी असेल रविवारी क्लिनिक बंद असेल.

असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, निगडीचे अध्यक्ष श्री प्रमोद भावसार यांनी क्लिनिकचे उद्घाटन केले आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुनील अग्रवाल आणि श्री सतपाल मित्तल होते. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स आणि अग्रवाल समाजाचे अनेक मान्यवरदेखील याप्रसंगी उपस्थित होते.
LASWF चे संचालक श्री राजपाल आस्य यांनी माहिती दिली की ट्रान्सपोर्ट नगर परिसरात सुमारे ७००० ते १०००० स्थायी व अस्थायी स्वरुपाची लोकसंख्या असून या भागात कोणतेही दवाखाने नाहीत. वाहतूक व्यवसायाशी निगडित असणा या स्थानिक लोकांना आणि चालक व क्लीनर जे की समाजाची जीवनरेखा म्हणून ओळखले जातात त्यांना या मोफत आरोग्यसेवेचा फायदा घेता येईल व त्यांचे आरोग्य चांगले राखले जाईल जे की सर्वोपरी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button