‘होय, आम्ही नालायक आहोत – शिवराजसिंह चौहान
भोपाळ: मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना नालायक म्हटले होते. या टीकेला आता चौहान यांना सडेतोड उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे कमलनाथ यांच्या टीकेला उत्तर देताना शिवराज यांनी डझनभरवेळा नालायक या शब्दाचा वापर केला.
राज्यातील गरिब जनतेसाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विविध योजनांची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी कमलनाथ यांच्या टीकेला उत्तर दिलं. ‘होय, आम्ही नालायक आहोत. कारण आम्ही वसाहती वैध ठरवल्या. होय, आम्ही नालायक आहोत. कारण आम्ही अवघ्या एका रुपयात गरिबांना गहू देतो,’ अशा शब्दांमध्ये चौहान यांनी कमलनाथ यांना प्रत्युत्तर दिले. राज्यातील अवैध वसाहती वैध ठरवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चौहान पत्रकारांशी बोलत होते. कमलनाथ यांच्या टीकेचा चौहान यांनी जोरदार समाचार घेतला. ‘आम्ही गरिबांवर उपचार करतो, त्यामुळे आम्ही नालायक झालो. योजना खूप चांगली आहे. मात्र तरीही ते आम्हाला नालायक म्हणताहेत,’ असे चौहान यांनी म्हटले.