breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना नक्की कोणाची? पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिपण्णी

महाईन्यूज । नवी दिल्ली ।


शिवसेना नक्की कोणाची, याबाबत सुरू असलेल्या वादावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे देण्यात आलं असून याबाबत आता पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. तसंच पक्षाच्या चिन्हाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असतील, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांची अपात्रता, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड, पक्षाने काढलेला व्हिप या मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्परविरोधी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वादावर १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी न्यायालयाने १० दिवस लांबणीवर टाकली होती. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी अपेक्षित होती. पण त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायामूर्ती उपस्थित नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली होती. कालही (सोमवार) सुप्रीम कोर्टाच्या सप्लीमेंट्री लिस्ट (पूरक यादी) मध्ये महाराष्ट्राचे कामकाज आजसाठी समाविष्ट नसल्याने आज ही सुनावणी होणार नसल्याचं बोललं गेलं. मात्र अखेर सकाळी सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button