breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘Surrogacy’ विधेयकाच्या सुधारित मसुद्यानुसार विधवा आणि घटस्फोटित महिलांनाही आता आई होता येणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने सरोगसी विधेयकाच्या सुधारित मसुद्यानुसार विधवा आणि घटस्फोटित महिलांनाही आता आई होता येणार आहे…ज्या जोडप्यांना मूल होत नाही, त्यांना सरोगसीचा आधार असतो. सरोगसीद्वारे मूल मिळवून या जोडप्यांना आई-बाबा होण्याचा आनंद मिळवता येतो. मात्र आता फक्त विवाहित जोडप्यांना नाही तर एकट्या असलेल्या महिलेलाही तिची आई होण्याची इच्छा पूर्ण करता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सरोगसी विधेयकाच्या सुधारित मसुद्याला मंजुरी दिली आहे. सरोगसी रेग्युलेशन बिल 2020 चा मसुदा बुधवारी केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

या नव्या विधेयकानुसार, कोणतीही महिला आपल्या इच्छेनुसार सरोगेट मदर बनू शकते. एकट्या महिलेला सरोगसीद्वारे मूल जन्माला घालता येईल. मात्र ती महिला विधवा आणि घटस्फोटित असायला हवी आणि तिचं वय 35 ते 45 असायला हवं, अशी अट सरकारने घातली आहे.  त्यामुळे मूल नसलेल्या जोडप्यांशिवाय विधवा आणि घटस्फोटीत महिलांनाही याचा फायदा होईल.

जुन्या विधेयकाला लोकसभेनं 2019 मध्ये मंजुरी दिली होती. यात फक्त जवळच्या नातेवाईकांना सरोगेट माता बनवण्यास परवानगी होती, ज्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यसभेतील निवड समितीकडे हे विधेयक पाठवण्यात आलं. समितीने या विधेयकाचा अभ्यास केला आणि शिफारशींनुसार नवं विधेयक तयार करण्यात आलं.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितलं की, नव्या विधेयकाच्या मसुद्यात राज्यसभेतील निर्वाचित समितीच्या सर्व शिफारशींचा समावेश केला आहे. समितीने सरोगसी बिलाच्या जुन्या मसुद्याचा अभ्यास केला आणि सरोगसीच्या अवैध व्यापारावर प्रतिबंध लावण्याचं सांगितलं.कॅबिनेट बैठकीनंतर महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितलं की, नव्या प्रस्तावित विधेयकानुसार, फक्त भारतीय जोडप्यांना देशात सरोगसीद्वारे मूल जन्माला घालता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button