breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांना श्रद्धाजंली अर्पण ; महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

पिंपरी –  भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री  पांडुरंग फुंडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची तहकूब सभा 20 जून दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर नितीन काळजे होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेची मे महिन्याची तहकूब सभा सोमवारी (दि.11) रोजी आयोजित केली होती. या सभेत महापालिका शिक्षण समिती सदस्याची निवड, शहरातील पार्किंग धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात येणार होते, तसेच अन्य विविध प्रश्नावर देखील चर्चा करण्यात येणार होती. परंतू, सत्ताधारी भाजपाने ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर, पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे पती व वरिष्ठ पोलीस अधिकारी उदय शुक्ला, जम्मू-काश्मीर येथील श्रीनगर येथील दहशतवादी हल्लात मृत्यू झालेल्या दोन जवानांना सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. नगरसेवक विलास मडेगिरी यांनी श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला नगरसेवक नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मे महिन्याची तहकूब सभा 20 जून दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button