breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये विहिरी, कूपनलिका, अनधिकृत नळजोडचे सर्व्हेक्षण सुरु

पिंपरी | महाईन्यूज |

पाणीटंचाई टाळण्यासाठी शहरातील खासगी विहिरी आणि कूपनलिका ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असून त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरु केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी गुरुवारी दिली.

विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाहणीबरोबरच अनधिकृत नळजोड धारकांवर कारवाईच्या मोहिमेस सुरवात करण्यात आली आहे. सुरवातीच्या टप्प्यात व्यावसायिक आणि त्यानंतर रहिवासी वापर असलेल्या अनधिकृत नळजोडधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
गतवर्षी पाणीटंचाईचा घेतलेला अनुभव, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनसह शहरातील नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत वरचेवर केलेल्या तक्रारीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button