breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पवना सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतून सुनील लांडगे यांची माघार!

आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीला यश

पिंपरी : आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्थीला यश आले असून, पवना सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतून जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्य सुनील नथु लांडगे यांनी माघार घेतली आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, संचालक व्ही एस काळभोर, शांताराम गराडे, माजी जेष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, मा स्विकृत नगरसेवक कुणाल लांडगे, उद्योजक नविन लायगुडे, भाजपा कार्यकर्ते संतोष टोणगे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुनी बँक असलेल्या पवना सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक ९ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. अर्ज माघार घेण्यासाठी आजपर्यंत मुदत आहे.

माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांच्यासह सर्वांच्या विनंतीला मान देत सुनील लांडगे यांनी माघार घेत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे. सुनील लांडगे यांनी माघार घेतल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर सहकार पॅनल जाहीर करण्यात आले आहे. सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्‍वर लांडगे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, जयनाथ काटे, शिवाजी वाघेरे, शामराव फुगे, शरद काळभोर, सचिन चिंचवडे, अमित गावडे, चेतन गावडे, सुनील गव्हाणे, जितेंद्र लांडगे, बिपीन नाणेकर, सचिन काळभोर तर अनुसूचित जाती गटातून दादू डोळस, महिला राखीव गटातून जयश्री गावडे, उर्मिला काळभोर, इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दौडकर यांचा पॅनेलमध्ये समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button