breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभा मतदार संघात विशेष मतदार नोंदणी अभियान

पिंपरी –  भारत निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणेत येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदार संघात येत्या शनिवारी (दि.23) विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त व मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी दिली.

15 मे 2018 पासून मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून छायाचित्र मतदार यादीमध्ये नांव नोंदणेकामी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन पडताळणी करणेचा कालावधी 20 जून 2018  पर्यंत होता. 205 चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार मदत केंद्रांवर फॉर्म नं. 6,7,8 व 8 ‘अ’ चे फॉर्म स्वीकारण्याचे कामकाज चालू आहे.  मतदार मदत केंद्रे पुढीलप्रमाणे:- मतदार नोंदणी अधिकारी, 205 चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय, यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुल, दुसरा मजला, थेरगांव, पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य इमारत, करआकारणी व करसंकलन विभाग, ‘ब’, ‘ड’ आणि  ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय  त्याचप्रमाणे सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना पात्र नागरिकांकडून फॉर्म नं. 6 स्वीकारण्याबाबत कळविणेत आले आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात या कार्यालयामार्फत शनिवारी सकाळी दहा ते पा वाजेपर्यंत मतदार नोंदणी विशेष मोहिम आयोजित केली आहे. जास्तीत-जास्त पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज जमा करावेत, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button