breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे’; राहुल आवारे

पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पीसीसीओई ऑलम्पिकचे आयोजन

पिंपरी : उज्ज्वल भविष्यासाठी जीवनात शैक्षणिक प्रगतीला महत्वाचे स्थान आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी एखाद्या क्रिडा प्रकारात प्रावीण्य मिळवले तरच आजच्या स्पर्धात्मक युगात खंबीरपणे वाटचाल करून यशस्वी होता येईल असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते पोलीस उपनिरीक्षक राहुल आवारे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) वतीने आयोजित केलेल्या ‘पीसीसीओई ऑलिम्पिक’ स्पर्धेचे उद्घाटन राहुल आवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते भारतीय आर्चरी संघाचे प्रशिक्षक डॉ. रणजीत चामले, ज्ञान प्रबोधिनी विद्यालय निगडीचे मुख्याध्यापक डॉ. मनोज देवळेकर, राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू समीर शिकेलकर, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. प्रवीण काळे, डॉ. अजय गायकवाड उपस्थित होते

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खेळाची तसेच स्वतःची शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी पीसीसीओई ऑलिंपिकचे आयोजन केले आहे.उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या सहाशे विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात संचलन केले. तसेच महाविद्यालयातील विविध खेळातील राष्ट्रीय खेळाडूंनी ऑलम्पिक मशाल प्रमुख पाहुण्यांना सुपूर्त करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘पीसीसीओई ऑलम्पिक’ ध्वजाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पीसीसीओईच्या आर्ट सर्कल विभागाने नृत्यातून खेळाचे सादरीकरण केले. तसेच पीसीसीओईची राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू तनया सप्ताश्वा हिने मल्लखांबची प्रात्यक्षिके दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

हेही वाचा – सामाजिक एकोप्याचा संदेश देत युवक राष्ट्रवादीचा ‘क्षितिज-२०२४’ उत्साहात

संपूर्ण देशामध्ये प्रथमच एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच जीवनाला नवी दिशा मिळेल अशा शुभेच्छा राहुल आवारे यांनी दिल्या.पीसीसीओई ऑलम्पिक मध्ये एकूण १२ क्रिडा प्रकारांमध्ये स्पर्धा होणारआहेत. या स्पर्धांमध्ये पीसीसीओई मधील सुमारे पाच हजार विद्यार्थी, ३५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

यासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनीही शुभेच्छा दिल्या. आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे, डॉ. लीना शर्मा व प्रा. अंजना आरकेरीमठ यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button