breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,66,668 वर

मुंबई – गुरुवारी दिवसभरात 5,902 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16,66,668 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 7,883 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 156 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 14,94,809 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 43,710 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 1,27,603 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 1,120 नवे रुग्ण आढळले, तर 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,55,362 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,186 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 1,824 जण कोरोनामुक्त झाल्याने मुंबईत आतापर्यंत 2,26,041 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 18,367 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 707 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,22,105 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7,828 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 707 रुग्णांपैकी 303 रुग्ण हे पुणे शहरातील असून 173 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button