breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

हेमा मालिनी अयोध्येत रामायणावरील नृत्यनाट्य सादर करणार, शेअर केला व्हिडिओ

Bollywood : बॉलीवूडची ड्रीम गर्ल नेत्या बनलेल्या हेमा मालिनी केवळ उत्कृष्ट अभिनयच करत नाहीत तर उत्तम नृत्य देखील करतात. भाजप नेत्या हेमा मालिनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त रामायणावर आधारित नृत्यनाटिका सादर करणार आहेत. बॉलिवुडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी अनेक क्लासिक चित्रपटांमध्ये त्यंच्या दमदार भूमिकांसाठी चित्रपटसृष्टीत ओळखल्या जातात.

अभिनेत्री-राजकारणी बनलेल्या हेमा मालिनी, आता भाजपच्या नेत्या आहेत, त्यांनी त्यांच्या कार्यालयातून एक नवीन क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये त्या राम मंदिराच्या अभिषेकासाठी अयोध्येला जाण्याबद्दल आणि तेथे नृत्यनाट्य सादर करण्याबद्दल बोलत आहेत.

हेही वाचा – सामाजिक एकोप्याचा संदेश देत युवक राष्ट्रवादीचा ‘क्षितिज-२०२४’ उत्साहात

जगतगुरू पद्मविभूषण रामभद्राचार्य यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त अयोध्येत अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री हेमा मालिनी या महोत्सवात खास परफॉर्मन्स देणार आहेत. १७ जानेवारी रोजी होणारे हे सादरीकरण रामायण आणि माँ दुर्गा यांच्या विशेष भागावर आधारित असणार आहे. हा कार्यक्रम १४ जानेवारीपासून सुरू होणार असून २२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. खुद्द हेमा मालिनी यांनी एक व्हिडिओ करून ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button