breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

उमेदवारी नाकारल्यानंतर जगदीश मुळीकांची पोस्ट व्हायरल!

पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये पुणे लोकसभेतून माजी महापौर मुरलिधर मोहोळ यांच्यावर भाजपने शिक्कामोर्तब केला आहे. मुरलधीर मोहोळ यांच्याबरोबर लोकसभेसाठी जगदीश मुळीक यांचंही नाव चर्चेत होतं. परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यानंतर जगदीश मुळीक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जगदीश मुळीक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोणतेही पद नसताना माझ्यासाठी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहता मी कायम कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यां,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. जगदीश मुळीक यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

हेही वाचा    –    ‘..तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार नाही’; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान 

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

  • सभासद, पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ
  • पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक
  • २००९ मध्ये खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली
  • २०१७-१८ मध्ये महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष
  • २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद
  • २०१९ ते २०२२ पुणे महापालिकेचे महापौर
  • २०२३ मध्ये प्रदेश सरचिटणीसपदावर नियुक्ती.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button