breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंधन दरवाढीवरुन राज्यव्यापी सह्यांच्या मोहीमेस पिंपरीत सुरुवात; काँग्रेस आक्रमक

पिंपरी । प्रतिनिधी

इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने दरवाढ केली जात आहे. मोदी सरकार पेट्रोल डिझेलच्या नावाखाली जनतेची लूट करत असून, या महागाईवरून सरकारला सळो की पळो करून सोडा, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पिंपरी येथे केले.

पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने 11 ते 15 जुलै पर्यंत राज्यव्यापी स्वरूपात नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेचा पिंपरी-चिंचवड शहरातील शुभारंभ तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपरी चौकाजवळील एचपी पेट्रोल पंपावर या मोहीमेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी इंटकचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॅा. कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी शिवराज मोरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे प्रभारी अक्षय जैन, युवक पिंपरी-चिंचवड काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे शहाराध्यक्ष डॅा. वसीम इनामदार, काँग्रेस सोशल मिडीयाचे शहराध्यक्ष आयुष मंगल, महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय चे उपाध्यक्ष ॲड.उमेश खंदारे, प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव कौस्तुभ नवले, काँग्रेस नेते अशोक काळभोर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, शहर युवक काँग्रेस चे सरचिटणीस अपूर्वा इंगवले, योगेश नायडू, अलोक लाड, विशाल सरवदे, मिलिंद बनसोडे, संतोष देवकर, बाबा गायसमुद्रे, स्वप्निल बनसोडे, अर्णव कामठे, तेजस पाटील, अनिकेत अरकडे, करणसिंग गील, रोहित तिकोणे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तांबे यांनी यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातला जनतेचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी व वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने “एकच लक्ष मोदी सरकार विरोधात एक कोटी साक्ष” अशा एक कोटी सह्या गोळा करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. या माध्यमातून  नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यात येथील

शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, महागाई विरोधातील या आंदोलनात नागरिकांच्या सहाभागासाठी सह्या घेऊन पाठिंबा घेण्यात येणार आहे. या मोहीमेस नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी उत्सुफूर्तपणे या मोहीमेत सहभागी होऊन केंद्रसरकारप्रती आपला निषेध नोंदवावा. या मोहीमेतंर्गत नागरिकांचे नाव,मोबाईल क्रंमाक व सही स्वाक्षरी पुस्तीकेत घेण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button