breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराला उच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई : सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली होती. 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने हा नामकरण सोहळा पार पाडणार होता. या नामकरणाला शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेसह अन्य काहींनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले. त्यावर कोणताही निर्णय झालेला नसताना राज्य सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही, असा दावा या याचिकेतून करण्यात आला.

या याचिकेवर न्यायमूर्ती शारुख काथावाल आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने 5 जूनपर्यंत सुनावणी तहकूब करत नामकरणावर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले. मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना विनोद तावडेंनी यासंदर्भात घोषणा केली की, दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सामंजस्याने समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, सोलापूर विमानतळास महात्मा बसवेश्वर विमानतळ, असे नाव देण्याचा निर्णय आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याचंही तावडेंनी नमूद केल होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button