Uncategorized

तुझी बायको पांढऱ्या पायाची म्हणुनच तू आमदार होवू शकत नाही; पुण्यातील बड्या राजकीय गुरुसह कुटुंबाला अटक!

पुणे : एका विवाहित स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या पुण्यातील बड्या राजकीय गुरूला चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे. ‘उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण’ या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय आहे प्रकरण?

उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केल्या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींमध्ये येंमुलचाही समावेश आहे. रघुनाथ येंमुल हा मोठा राजकीय गुरु असल्याची माहिती आहे. प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रघुनाथ येंमुल याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

 

रघुनाथ येमुलने काय सांगितले?

“तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिची जन्मवेळ चुकीची असून तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर ही तुझी बायको म्हणून कायम राहिली, तर तू मंत्री काय, आमदारही होणार नाहीस, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे” असा सल्ला प्रतिष्ठित कुटुंबाला या राजकीय गुरुने दिल्याचं समोर आलं आहे.

 

रघुनाथ येंमुलने पती गणेश गायकवाड याला आपल्या पत्नीविरोधात भडकावलं. याप्ररणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना अटकपूर्व जामीन झाला आहे. पती गणेश आणि राजु अंकुश फरार झाले आहेत. 27 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जानेवारी 2017 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

 

कोण आहे रघुनाथ येमुल?

48 वर्षीय रघुनाथ येंमुल हा पुण्यातील बाणेरमध्ये आयव्हरी इस्टेट भागात राहतो. राजकीय क्षेत्रापासून प्रशासनापर्यंत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येंमुलचे निकटचे संबंध असल्याची माहिती आहे. अनेक जण त्याच्या दरबारात हजेरी लावत असतात. रघुनाथ येंमुल याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button